Lokmat Political News | शरद पवारांची घेणार Raj Thackeray घेणार मुलाखत | ठाकरे शैलीत मुलाखत | Lokmat

2021-09-13 1

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राज ठाकरे घेणार असलेली बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मुलाखत रद्द झाल्या नंतर पुन्हा एकदा २१ फेब्रुवारीला तिसऱ्यांदा मुहूर्त मिळाला आहे. पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी ५ वाजता ही जाहीर मुलाखत होणार असल्याचे रामदास फुटाणे यांनी सांगितले.पुण्यामध्ये जागतिक मराठी अकादमी तर्फे आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ हे जागतिक संमेलन १ ते ३ जानेवारी दरम्यान पार पडले. या कार्यक्रमात सुरवातीला ३ जानेवारीला ही मुलाखत होणार होती. नंतर ती ६ जानेवारीला ठरवण्यात आली. दरम्यान कोरेगाव भीमा प्रकरणामुळे महाराष्ट्रा तील परिस्थिती बिघडली आणि हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.अखेर या मुलाखतीसाठी २१ फेब्रुवारी चा मुहूर्त सापडला आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires